आचरा देवूळवाडी येथे झाड पडून विद्यूत मंडळाचे नुकसान पावसाचा जोर कायम

ऐन मे महिन्याच्या मध्यान्ही सुरु झालेल्या अवकाळी पावसाचा जोर कायम असून आता मान्सूनचे आगमन ही जवळ आल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. यामुळे अनेकांची उन्हाळी कामे खोळंबली आहेत. रतांबा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळीआचरा रामेश्वर मंदिर घाटी पुजारेवाडी रस्त्यावर अतिवृष्टी मुळे वृक्ष कोसळल्याने विद्यूत तारा तुटण्यासह दोन पोल मोडून विद्यूत मंडळाचे नुकसान झाले. तसेच पुजारेवाडी देवूळवाडी रस्ता वाहतुकीस काही काळ बंद झाला होता. स्थनिक ग्रामस्थ मुन्ना आचरेकर,सौमित्र राणे, कांबळी,यांसह अन्य ग्रामस्थांनी पुढाकार घेत झाड हटवत रस्ता वाहतुकीस खुला केला.खबर मिळताच आचरा सरपंच जेरान फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर ,पोलीस पाटील जगन्नाथ जोशी,विठ्ठल धुरी यांनी भेट देत पहाणी केली.विद्यूत मंडळ सहाय्यक अभियंता अनिल मठकर यांनी तातडीने हालचाल करत सायंकाळी
विद्यूत पुरवठा सुरळीत करण्यात आला.





