चिंदर सडेवाडी येथे एस् टी कलंडली; सुदैवाने प्रवासी बचावले…!

चिंदर सडेवाडी येथे आज सकाळी मालवण विजयदुर्ग एस् टी बस कलंडली सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
सविस्तर बातमी अशी कि सकाळी मालवण आगार येथून सुटणारी गाडी नं MH 07-7424 मालवण आचरा हिंदळे विजयदुर्ग एसटी बस वायंगणी फाट्याच्या पुढे सडेवाडी येथे आली असता. एसटी चालकाने डंपरला बाजू देण्याचा प्रयत्न केला असता भूमीगत विद्युत वाहिनीसाठी खोदकाम करून वरती मलम पट्टी केलेल्या गटाराच्या भागात डाव्या बाजूला कलंडली सुदैवाने तोडलेल्या वटवृक्षाच्या भागाला लागून राहिल्यामुळे मोठ्या अपघात पासून बचावले. यामुळे परत एकदा गटारातून वा गटाराच्या लगत खोदकाम करून भूमीगत विद्युत वाहिनी टाकताना ठेकेदारने मलम पट्टी केलेली समोर आली आहे. एसटी मधील सर्व प्रवासी सुखरूप असून पर्यायी वाहनाने त्यांना मार्गस्थ करण्यात आले आहे. एसटी बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न मालवण आगारा कडून सुरू होते.





