मुले रंगलीत नामस्मरण भजनात

उन्हाळी सुट्टीत कणकवली कोरल सोसायटीच्या मुलांचा अनोखा उपक्रम

शाळांना उन्हाळी सुट्टी पडली आहे. त्यामुळे नाही कटकट नाही टेंशन हवे तेवढे खुशाल खेळा अशी स्थिती मुलांमध्ये निर्माण झाली आहे.मात्र खेळकुदणे, मोबाईल मध्ये वेळ न दवडता कणकवली बांधकर वाडी येथील कोरल अपार्टमेंटच्या मुलांनी एकत्र येत सायंकाळचा वेळ नामस्मरण आणि भजनात रमविला आहे.मोबाईल टिव्ही वरील गेम कार्टून मध्ये न रमता देवाच्या नामस्मरणात भजनात दंग होणारी मुले मात्र सर्वांचा कौतुकाचा विषय बनली आहेत.

खेळ कुदण्याबरोबरच धम्माल मौज मजा मस्ती करण्यासाठी मुलांसमोर वेळच वेळ निर्माण झाला आहे. काही पालक आपल्या मुलांना अतिरिक्त ज्ञान प्राप्त होण्यासाठी वेगवेगळ्या उन्हाळी शिबिरामध्ये प्रवेश घेत असतात तर काही मुले उन्हाळी सुट्टी चा उपयोग तासनतास मोबाईल टिव्ही मध्ये रमण्यातच घालवित असतात मात्र कणकवली बांधकरवाडी येथील कोरल अपार्टमेंट ची मुले खेळण्याबरोबरच सायंकाळच्या वेळी कोरल अपार्टमेंट मधील सदस्यांच्या घरी जाऊन नामस्मरण आणि भजन करत असल्याने या सोसायटीचे वातावरण सध्या भक्तीमय बनले आहे.
उन्हाळी सुट्टी मुळे गावच्या मुलांसोबत मुंबईची मुलेही सुट्टी चा आनंद घेण्यासाठी गावी आल्यामुळे सोसायटीचा मोकळा आवार मुलांच्या खेळण्या कुदण्याने भरुन गेला आहे. या खेळण्यासोबतच आध्यात्मिकतेचीही आवड मुलांमध्ये निर्माण व्हावी या हेतूने या सोसायटी मधील रहिवासी उदय करंबेळकर यांनी पुढाकार घेत मुलांना नामस्मरणाची
आवड लावली. मुलेही उत्स्फूर्त पणे टाळ मृदंगाच्या साथीने
तल्लिन होत नामस्मरण भजन करत आहेत.श्री राम जयराम जयजय राम, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,
दिगंबरा,दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,सोबतच हेभोळ्या शंकरा, रात्रंदिन देवा तुझी मुर्ती ध्यानात आदी भक्ती गीतांसह भजन सेवा सादर करत आहेत.
यात स्वानंद करंबेळकर, वेदान्त बापर्डेकर, रुद्धी घाडी, प्रेम पाचकुडे,दक्ष पाचकुडे,निधिश पालव,निष्ठा सावंत, परी कडकोळ,प्रेम कडकोळ , अन्वयी दळवी,मानस राणे ,आदी मुले सहभागी होत आनंद घेत आहेत ‌.या मुलांसोबत लहान होऊन
दत्ता डेगवेकर काका, सौ सविता डेगवेकर काकी, सौ अंजली बापर्डेकर, यश राणे,जयेश सावंत यांसह अन्य पालक यात सहभागी होत मुलांचा उत्साह वाढवित आहेत.याबाबत उदय करंबेळकर, सौ सविता डेगवेकर यांच्याशी संवाद साधला असता सध्याच्या मुलांमध्ये आध्यात्मिकतेचि आवड निर्माण व्हावी, मुले मोबाईल टिव्ही पासून दुर रहावीत हसतमुख आनंदी रहावीत,त्यांच्या मध्ये एकाग्रता वाढावी, या दृष्टीने मुलांना हा सायंकाळच्या वेळी नामस्मरणाचा छंद लावला.मुलेही यात तल्लिन होत आवडीने सहभागी होतआहेत . सोसायटीतील सध्या इथल्या स्थानिक मुलांसोबत मुंबईवरुन आलेली मुलेही सहभागी झाली आहेत. एकाच जागी बसून केले जाणारे नामस्मरण भजन आता आग्रहास्तव प्रत्येक सदस्यांच्या प्लॅट मध्ये जाऊन केले जात आहे. यामुळे त्या कुटूंबातील सदस्यही मुलांसोबत नामस्मरणात सहभागी होत आहेत. एकंदरच मुलांच्या या उपक्रमाने सोसायटीचे वातावरण भक्तीमय झाले असल्याचे ते सांगतात.
कणकवली बांधकरवाडी येथील
कोरल सोसायटीच्या मुलांनी मोबाईल टिव्ही सारख्या छंदात न रंगता सायंकाळच्या वेळी नामस्मरण भजनाचा अवलंबलेला छंद कौतुकाचा विषय बनला आहे.

error: Content is protected !!