वारगाव पोलीस पाटील पदी दिलीप नावळे यांची निवड

कणकवली तालुक्यातील वारगाव येथील पोलीस पाटील पदी दिलीप चंद्रकांत नावळे यांची निवड झाली असून नवनियुक्त पोलीस पाटील यांना उपविभागीय दंडाधिकारी जगदीश कातकर यांच्या सहीचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. नवनियुक्त पोलीस पाटील यांची निवड 06/09/2024 ते 31/08/2029 पर्यंत अशी पाच वर्षाची असून त्यांच्या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.





