सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, आपत्ती व्यवस्थापनाची तातडीची बैठक

पालकमंत्री नितेश राणे घेणार आढावा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. अवेळी व सततच्या पावसामुळे विविध ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडण्याचे प्रकारही घडले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून त्यामुळे काही ठिकाणी पूरस्थितीची शक्यता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांनी २४ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक बोलावली आहे.





