आचरा पंचक्रोशीतील शाळांचा100% निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आलेली होती. यात आचरा पंचक्रोशीतील शाळांचा निकाल 100% लागला आहे
1) न्यू इंग्लिश स्कूल आचराचा 100 टक्के निकाल
धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कुल आचरा हायस्कूल ने दहावी परीक्षेत उज्वल यश संपादन करत सर्व च्या सर्व 74 विद्यार्थी पास होत १०० टक्के निकाल लागला. प्रथम क्रमांक भूमी आशिष नाबर 96.80 टक्के, द्वितीय क्रमांक कुंदन धनंजय नाटेकर 92.40 टक्के, तृतीय क्रमांक रिया महेश गांवकर 90.00टक्के प्राप्त केलेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब मिराशी, स्थानिक स्कूल कमेटी चेअरमन निलिमा सावंत, समिती सदस्य बाबाजी भिसळे, अर्जुन बापर्डेकर, राजन पांगे, संजय पाटील तसेच मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक अंकुश घुटूकडे यांनी अभिनंदन केले आहे
2) आचरा इंग्लिश मिडीयमचा निकाल १०० टक्के.
धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित माध्यमिक शालांत परीक्षेत नामदेव शंकर कावले इंग्लिश मिडियम स्कुल आचरा चा निकाल १००%लागला आहे असून.
या प्रशालेतून 35 विद्यार्थी परीक्षेत बसले होते ते सर्वजण उत्तीर्ण झाले असून १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. या विद्यार्थ्यांमध्ये विशेष नाविन्यपूर्ण यश प्राप्त केले. प्रथम क्रमांक दिनेश प्रफुल्ल माळगावकर -92.00 टक्के, द्वितीय क्रमांक मिताली संजय माळकर – 91.80 टक्के तृतीय क्रमांक मधुरा नरेश मसुरकर 90.80टक्के या विध्यार्थ्यानी प्राप्त केलेत या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब- मिराशी, स्थानिक स्कूल कमेटी अध्यक्ष निलेश सरजोशी,खजिनदार परेश सावंत, सदस्य मंदार सांबारी, सुरेश गांवकर, दिलीप कावले, मुख्याध्यापिका मायलीन फर्नांडिस यांनी अभिनंदन केले आहे.
3) वायंगणी हायस्कूलचा निकाल१००टक्के.
वायंगणी येथील श्री ज्ञानदीप माध्यमिक विद्यामंदिर वायंगणी हायस्कूलचे दहावी परीक्षेस बसलेले सर्वच्या सर्व 17 विद्यार्थी पास होत या शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. प्रथम मंजिरी पुरुषोत्तम घाडीगावकर 94.00 टक्के, द्वितीय क्रमांक सेजल सत्यवान केळूसकर 88.20 टक्के, तृतीय क्रमांक आकांक्षा मंगेश तोंडवळकर 86.80 टक्के प्राप्त केलेत या यशस्वी विद्यार्थ्यांचे स्कूल कमेटी सदस्य पदाधिकारी ,मुख्याध्यापक ,शिक्षक पालक यांनी अभिनंदन केले आहे.
4) त्रिंबक हायस्कूलचा निकाल१००टक्के.
त्रिंबक येथील जनता विद्यामंदिर त्रिंबक हायस्कूल दहावी परीक्षेस बसलेले सर्वच्या सर्व 22 विद्यार्थी पास होत या शाळेचा निकाल १००टक्के लागला आहे.
या शाळेतून प्रथम क्रमांक कोमल संतोष अपराज 92.20 टक्के, द्वितीय क्रमांक शर्वरी प्रशांत परब 92.00 टक्के, तृतीय क्रमांक केतकी प्रसाद घाडीगावकर 90.20 टक्के मिळवून यश संपादन केले आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे माध्यमिक शिक्षण समिती त्रिंबकचे अध्यक्ष श्री सुरेंद्र सकपाळ, उपाध्यक्ष श्री अशोक बागवे, कार्यवाह श्री अरविंद घाडी, तसेच सर्व कार्यकारणी तसेच मुख्याध्यापक श्री. प्रवीण घाडीगांवकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
5) आडवली हायस्कूलचा निकाल१००टक्के.
आर ए यादव हायस्कूल आडवलीचा दहावी परीक्षेचा निकाल १००टक्के
आर ए यादव हायस्कूल आडवली दहावी शालांत परीक्षेत प्रविष्ठ सर्वच्या सर्व 15विद्यार्थी पास होत शंभर टक्के यश संपादन केले.या परीक्षेत ऋतुजा सुरेश मेस्त्री हिने 86.80टक्केगुण मिळवून प्रशालेतून प्रथम येण्याचा मान मिळविला. प्रशालेतून द्वितीय भक्ती दिपक लाड हिने
81टक्के तर सानिका उमेश घाडीगांवकर 79.60 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वोदय एज्यूकेशन सोसायटी मुंब ई संस्थाचालक, मुख्याध्यापक शिक्षक आदींनी अभिनंदन केले आहे.