कोळोशी गावचे माजी पोलीस पाटील वासुदेव इंदप यांचे निधन

कोळोशी गावचे माजी पोलीस पाटील वासुदेव उर्फ अण्णा इंदप(८२) यांचे आज सकाळी ११:०० वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
कोळोशी गावातील एक आदरणीय व्यक्ती व नेहमी सत्याच्या बाजूने खंबीरपणे उभा राहणारा माणूस अशी त्यांची ओळख होती.सर्वांमध्ये मिळून मिसळून आणि गाव एक संघ ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करणा-या अण्णांच्या निधनाची बातमी कळताच परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुलगे, एक मुलगी,सुना नातवंडे,जावई असा परिवार आहे.