चिंदर भटवाडी शाळेत श्रीमद भगवतगीता पठण कार्यक्रम!

चिंदर गावचे आराध्य दैवत भगवती माऊलींच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा चिंदर भटवाडीच्या वतीने श्रीमद् भगवतगीतेचा (संस्कृत आणि मराठी अनुवाद) पठण कार्यक्रमाचे आयोजन भगवती माऊली मंदिरात करण्यात आला होता.

दीपप्रज्वजन, श्रीमद् भगवतगीता पूजन, मान्यवरांचे स्वागत करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कुरूक्षेत्रा मध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला. त्याच भगवतगीतेचा चिंदर भटवाडी जि.प.शाळेच्या बालवाडी ते इयत्ता चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोक व त्यांचा मराठी अर्थ निर्भीडपणे कथन करत उपस्थितांना प्रभावित केले. या मध्ये तनुश चिंदरकर, वेदांत दळवी, समर्थ काळे, तनिश खोत, मिहीर पारकर, मैथिली नाटेकर, रुद्रनाथ दळवी, नीरज दळवी, सुजन चव्हाण, सर्वेश कदम, भावेश नांगरे, आयुष नार्वेकर, कुणाल मुळे यांनी सहभाग घेतला.

केंद्र प्रमुख राजेंद्र प्रसाद गाड, शिक्षण समिती अध्यक्ष जीवन हजारे, शशिकांत नाटेकर, माजी सभापती हिमाली अमरे, उपसरपंच दीपक सुर्वे, माजी सरपंच धोंडी चिंदरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

धार्मिक गुण समाजा पर्यंत पोचतील – विलास हडकर

     इंग्रजांनी लादलेल्या मेकॉले शिक्षण पद्धतीमुळे भारतातील प्राकृत भाषा असलेली संस्कृत भाषा आज  मर्यादित राहिली आहे.  अशा कार्यक्रमामुळे मुलांना संस्कृत भाषेची ओळख होऊन मुलांमध्ये सभाधीटपणा निर्माण होतो. बालवयात असे संस्कार होणें अत्यंत महत्त्वाचे आहे. 

मोबाईल, टिव्ही पासून मुलांना दुर ठेवा असा हि सल्ला यावेळी हडकर यांनी दिला. ते पुढे म्हणाले कि कुटुंब संस्था संपत चालली आहे. हिंदू निद्रा अवस्थेत असून आत्मकेंद्रित झाला आहे. पुढचा काळ हिंदू संस्कृती साठी कसोटीचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या धर्माच्या रक्षणासाठी सर्वस्वाचा त्याग केला या गोष्टी मुलांच्या मनावर रुजवा आणि याद्वारे आपले धार्मिक गुण समाजा पर्यंत पोचतील.

यावेळी भगवती उत्साही मंडळाचे अध्यक्ष सुनिल पवार, संदिप परब, दिगंबर जाधव, संजय हडपी, रवि घागरे, अजित साटम, महेंद्र कदम, विश्वनाथ दळवी, विजय घाडी, धनंजय नाटेकर, सिध्देश नाटेकर, गणेश गोगटे, अनंत तोरसोळकर, अमृता तोरसोळकर, विश्वनाथ चिंदरकर, धाकू घाडी, विभावरी चव्हाण, बाळकृष्ण नार्वेकर,
नवनाथ दळवी, पूर्वा चव्हाण भगवती उत्साही मंडळाचे कार्यकर्ते आदी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

बहारदार निवेदन आणि कार्यक्रमाचे नियोजन सौ. निशिगंधा वझे यांनी केले तर आभार शशिकांत नाटेकर यांनी मानले. मैना कारंडे आणि भाग्यश्री फाटक यांनी विशेष सहाय्य केले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

error: Content is protected !!