कणकवलीतील वकील संयोगिता राणे यांची नोटरी पदी नियुक्ती

कणकवली येथे वकिली व्यवसाय करणाऱ्या ऍड. संयोगिता संदीप राणे यांची नोटरी पदी नियुक्ती झाली आहे.
त्यांचे शिक्षण कऱ्हाड येथे झाले. तिथेच एल.एल.बी व एल.एल.एम.चे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. विवाहानंतर त्या कणकवली येथे स्थायिक झाल्या आहेत. गेली १३ वर्ष त्या वकिली व्यवसाय करत आहेत. त्यांचे पती ऍड.संदीप अशोक राणे यांच्यासह त्यांनी दिवाणी,महसूल अशा विवध प्रकारच्या केसेस हाताळल्या आहेत. आता भारत सरकारद्वारे नोटरी म्हणून काम करण्याचे अधिकार दिल्याचे त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यांची नोटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वसामान्यांसाठी पहिल्या प्रमाणेच प्रामाणिक सेवा देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!