वागदे येथे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांची भेट

कंपोस्ट खड्ड्यांची केली पाहणी

आजपासून जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा अभियानास सुरुवात करण्यात आली त्यानिमित्ताने वागदे येथे करण्यात आलेल्या खड्ड्यांचा शुभारंभ गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या उपस्थितीत सरपंच संदीप सावंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी मनोज वालावलकर, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, ग्रामसेवक युवराज बोराडे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!