उंबर्डे कुंभार समाज सेवा मंडळ,मुंबई (रजि) व समस्त ग्रामस्थ मंडळ,कुंभारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वशांती अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे,येथील मौजे कुंभारवाडी गावात श्री संत गोरोबा काका समाज मंदिरात सालाबादप्रमाणे या वर्षीही उंबर्डे कुंभार समाज सेवा मंडळ,मुबई (रजि).व समस्त ग्रामस्थ मंडळ,कुंभारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वै. गुरुवर्य गणपत बाबा महाराज गुडेकर (अलिबागकर महाराज श्री क्षेत्र पंढरपूर) व वै.गुरुवर्य गोपाळ बाबा वाजे महाराज,(श्री क्षेत्र पंढरपूर) व वै.सदाशिव महाराज गांवकडकर,कुंभारवाडी यांच्या कृपाक्षेत्राखाली,आणि गुरुवर्य मा.नारायण दादा वाजे महाराज,(अलिबागकर,पंढरपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत गोरोबा काका पुण्यतिथी निमित्त शुक्रवार ता.२५ एप्रिल २०२५ ते रविवार ता.२७ एप्रिल २०२५ या तीन दिवसांच्या कालावधीत विश्वशांती अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.त्या प्रसंगी श्रीमद् ज्ञानेश्वरीवरील सामुदायिक पारायण,किर्तन,प्रवचन, भजन व महिलांसाठी हळदीकुंकू,पैठणीचा खेळ, गौरव समारंभ इ.कार्यकम आयोजित करण्यात आले आहेत.
सप्ताह सोहळ्याचे हे ३४ वे वर्ष असून अश्या धार्मिक कार्यक्रमासोबत संस्था गेली ५० वर्ष ग्रामस्थांच्या पाठबळाने,संस्थेच्या पदाधिकारी,कार्यकारी सदस्य व सभासदांच्या सहकार्याने शिवाय तितक्याच मोलाच्या योगदानामुळे व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सामाजिक,शैक्षणिक व ग्रामविकास व्हावा या साठी सातत्याने कार्यरत आहे.कुंभारवाडी हा गाव शैक्षणिक दृष्ट्या पण सक्षम झाला असून शैक्षणिक प्रगतीमुळे विकास कामाना गती येईल अशी अपेक्षा आहे.
तीन दिवसाच्या कालावधीत संपन्न होणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात पंचक्रोशीतील भाविकांनी,माहेरवाशीनी व हितचिंतकांनी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष वामनराव धामणकर यांनी प्रसिद्ध पत्रकात केले आहे.

error: Content is protected !!