हळवल येथील सुधीर परब यांचे निधन

कणकवली तालुक्यातील हळवल परबवाडी ( वय 57 ) येथील रहिवाशी सुधीर सखाराम परब यांचे शुक्रवारी सायंकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. सुधीर परब हे अत्यंत मनमिळावू व सुस्वभावी व्यक्ती म्हणून सर्वपरिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, वाहिनी, पुतण्या पुतणी असा परिवार आहे. सुधीर परब यांच्या जाण्याने हळवल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुधीर परब यांच्या पार्थिव देहावर शुक्रवारी रात्री शोकाकुल वातावरणात हळवल परबवाडी येथील स्मशान भूमीत अंत्य संस्कार करण्यात आले.