तायक्वांदो बेल्ट प्रमोशन टेस्ट मध्ये नडगिवे येथील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मीडिअम स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उज्वल यश

तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग आणि नॅशनल इंग्लिश मेडिअम स्कूल नडगिवे यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या तायक्वांदो बेल्ट प्रमोशन टेस्ट मध्ये नडगिवे येथील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मेडिअम स्कूल नडगिवे च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. ही बेल्ट परीक्षा राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक भालचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यावेळी सोनिया ढेकणे व दुर्वा गावडे ह्या उपस्थित होत्या. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या मुख्याध्यपिका सौ. निलम डांगे तसेच सहाय्यक शिक्षिका सौ. जान्हवी हर्डीकर, सौ. सिद्धी जोशी, सहाय्यक शिक्षक श्री. अमोल चौगुले यांच्या हस्ते बेल्ट व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
येलो बेल्ट-मनवा पाताडे, गौरवी सावंत, इबाद नाकवा, विघ्नेश जाधव, तन्वी भांबूरे, रुद्र जाधव, धनश्री माळकर, सोहम कुबल, आयेशा मुकादम,आरोही पाटणकर, अमिना पटेल मोहम्मद रयान काझी, जयवीर दयानी, आदिश तुपे, नाबिया सोलकर, रेयांश सावकार, स्वरा गुरव, सोहम कुंबळे, संकेत शेट्ये, प्रद्युम स्वामी, मारिया डोंगरकर, शुभ्रा बाबरदेसाई, हादिया सारंग, रयान मुकादम, राजवीर राणे, शिवम तेली, हुमेद काझी, तरेश तुरळकर. झयान काझी.
ग्रीन बेल्ट – साई गुरव, आमना गिरकर, साईश कुबल, अथर्व कुबल, झैद काझी, रिदाफातिमा पटेल, वेद कदम, श्रुती कावळे, कांचन अडुळकर, साहिल अडुळकर, स्वरा कुबल, हर्षण अडुळकर, सोहा चौगुले, अदनान काझी, अफान काझी, निधी कोवाळे, देविका माळकर, आराध्या पाटणकर, रुद्र राणे, अर्णव राणे, जान्हवी राणे, शुभ्रा चिके, जिया तळगांवकर, आराध्य सावंत, जय राणे, अफराह काझी,
ग्रीन -1 बेल्ट -चिन्मय गुरव.
सर्व विद्यार्थ्यांना प्रशाळेचे क्रीडा शिक्षक व राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक व पंच एकनाथ धनवटे यांचे मार्गदर्शन लाभले,
सर्व विद्यार्थ्यांचे आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडिअम स्कूल नडगिवेचे अध्यक्ष श्री. मनोज गुळेकर, कार्याध्यक्ष श्री. रघुवीर राणे, सेक्रेटरी श्री. मोहन कावळे, सहसचिव श्री. राजेंद्र ब्रम्हदंडे, खजिनदार श्री. परवेज पटेल तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. निलम डांगे तसेच सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!