वामनराव महाडिक विद्यालयात जिल्हास्तरीय उर्दु परिसंवाद संपन्न…विविध स्पर्धांचे आयोजन

उर्दु भाषेचा गोडवा जपण्याचे काम उर्दु शिक्षक करत आहेत: डाएट प्राचार्य राजेंद्र कांबळे.
उर्दू शिक्षक चांगले काम करत आहेत.या परिसंवादाच्या निमित्ताने अप्रतिम वाचन साहित्यनिर्मिती केली आहे.थ्रीडी स्वरूपातील साहित्यनिर्मिती करून योग्य वाचन साहित्य निर्मिती केली आहे.उर्दू भाषेत गोडवा आहे, ही उत्कृष्ट भाषा असून तिचा गोडवा जपण्याचे काम सर्व शिक्षक अत्यंत तळमळीने करत आहेत,असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी केले. ते तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवनात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय उर्दू परिसंवादात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर डाएट अधिव्याख्याता तथा उर्दू विभाग प्रमुख राजेंद्र जाधव, डॉ. सुरेश माने, उर्दू वक्ता मुनाफ गुहागरकर, उर्दू विस्तार अधिकारी श्रीम. अफसर बेगम आवटी, उर्दू वाचन दूत फैजुल्ला खान, तळेरे विद्यालयाचे प्राचार्य अविनाश मांजरेकर, सरफराज पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. उर्दू वाचन कार्यक्रम 2.0 अंतर्गत एक दिवसीय जिल्हास्तरीय परिसंवाद (Symposium) तळेरे विद्यालयात संपन्न झाला.
या परिसंवादात जिल्हा स्तरावरून शिक्षकांनी PPT सादरीकरण , Poster सादरीकरण , TLM निर्मिती इ. सहभाग नोंदविले होते. यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
PPT सादरीकरण : (प्रथम तीन) अबूबकर नगरकर (जि.प.आचरे. उर्दू शाळा ता. मालवण), मोहम्मद सलमान अब्दुल कय्युम (जि.प.विजयदुर्ग उर्दू शाळा ता. देवगड), अन्वर अली खान (जि.प.प्रा. नांदगाव उर्दू शाळा ता.कणकवली)
Poster सादरीकरण (प्रथम तीन) : रुकैय्या रफिक तहसिलदार (जि.प. आदर्श शाळा गिर्ये उर्दू ता. देवगड), समीर मुसा बागसार (जि प शाळा घालवली उर्दू ता. देवगड), अमिना इमरान नवाब (जि प शाळा मणचे उर्दू ता देवगड)
TLM निर्मिती (प्रथम तीन) : झीनत कौसर रुबाब फकीर (जि.प.प्रा. नवानगर उर्दू ता देवगड), मोहम्मद शफी सोलकर (जि.प. उंबर्डे उर्दू ता वैभववाडी), इरफान शेख (जि प शाळा झराप उर्दू ता कुडाळ) या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण तन्वीर सोलकर आणि वामनराव महाडिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक विनायक टाकळे यांनी केले.
यावेळी प्राचार्य राजेंद्र कांबळे, डॉ. सुरेश माने, प्राचार्य अविनाश मांजरेकर, पत्रकार निकेत पावसकर यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर मुसा बागसार यांनी तर आभार सोलकर यांनी मानले.