कणकवली शहरातील कृत्रिम धबधबा जनतेच्या सेवेत दाखल

मुख्याधिकारी गौरी पाटील यांची माहिती

कणकवली गणपती साना येथे बारमाही वाहणारा कृत्रिम धबधबा आता सुरू करण्यात आला आहे. जनतेच्या सेवेत हा धबधबा दाखल झाला असल्याची माहिती मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिली. धबधबा सुरू झाल्यानंतर बच्चे कंपनीनी या धबधब्याखाली आंघोळ करण्याचा आनंद लुटला. धबधब्याचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले होते.उद्घाटन झाल्यानंतर काही महिने तांत्रिक अडचणींमुळे हा धबधबा बंद होता. पण या तांत्रिक अडचणी दूर करून आता हा धबधबा कणकवली वासीयांना खुला करण्यात आला असून सध्या याची वेळ सायंकाळी 5:30 ते रात्री 8 अशी ठेवण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी सांगितले आहे.
त्यामुळे कणकवली शहरासह अन्य सर्वसामान्याना बारमाही वाहणाऱ्या धबधब्याच्या खाली आंघोळ करण्याचा आनंद लुटता येणार आहे.

error: Content is protected !!