कणकवली नगरपंचायत आयोजित योग प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद

मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या हस्ते प्रशिक्षणाचा शुभारंभ

    कणकवली नगरपंचायत महिला बालकल्याण विभागाच्यावतीने कणकवली शहरातील युवती व महिलांसाठी 15 दिवसीय मोफत योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उदघाट्न मुख्याधिकारी श्रीम. गौरी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर योग प्रशिक्षक श्री. आनंद सावंत, नगरपंचायतीच्या प्रियांका सोन्सूरकर, सोनाली खैरे, कनकसिंधू शहर स्तर संघ अध्यक्ष प्रिया सरूडकर तसेच नगरपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.
 सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी आपल्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक असून निरोगी आरोग्यासाठी योगा हे एक उत्तम माध्यम असल्याने नगरपंचायत कडून 15 दिवसाचे योग प्रशिक्षण कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं तसेच प्रशिक्षण संपल्यानंतरही महिलांनी आपल्या घरी योगा करावा या उद्धेशाने सहभागी महिलांना प्रशिक्षण अनुषंगीक साहित्यही मोफत देण्यात आलं आहे. या कार्यक्रमात 18 वर्ष वयापासून 70 वर्षा पर्यत च्या सर्व वयोगटातील महिलांनी उस्फुर्त सहभाग घेत जीवनात योग किती आवश्यक आहे हे अधोरेखित केले.
error: Content is protected !!