Views: 195
महिला दिनाचे औचित्य साधत खारेपाटण हायस्कूल येथे परिसरातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. महिला दिनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खारेपाटण कॉलेजचे प्राचार्य श्री संजय सानप होते. महिला दिनाची औचित्य साधून व्यासपीठावर उपस्थित कर्तुत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला . यामध्ये खारेपाटण ग्रामपंचायत सरपंच सौ .प्राची इस्वलकर. खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. सौ.प्रिया वडाम मॅडम, डॉक्टर सौ. मालडकर मॅडम, महिला बचत गटाच्या सौ.आस्था पाटणकर , सौ. पोटले मॅडम, उद्योजिका सौ. तृप्ती पाटील, सौ. देवस्थळी मॅडम, कुमारी प्रणाली बाणे C.H.O. नडगिवे , सौ. शर्मिन काझी तिथवली यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री संजय सानप यांनी आपले मनोगत व्यक्त केले व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर महिलांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्राजक्ता कोकाटे मॅडम यांनी केले व आभार सौ.आशा भोर मॅडम यांनी मानले.