कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाजसेवा मंडळातर्फे उपनयन संस्कार सोहळा 2 मे रोजी

ज्ञाती बांधवांनी सहभागी होण्यासाठी संपर्क साधावा
कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण समाज सेवा मंडळ तालुका कणकवलीच्या वतीने कणकवली तालुक्यातील कुडाळदेशकर आद्यगौड ब्राह्मण समाजातील बटूंचा उपनयन संस्कार कार्यक्रम शुक्रवार ०२ मे २०२५ रोजी फोंडाघाट येथील संस्थेच्या “पूर्णानंद भवन” येथे आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. तरी या ज्ञातीमधील ज्या बटूंच्या मौजी या कार्यक्रमात करावयाच्या आहेत त्यांच्या पालकांनी बटूंची नावे नोंदणी करणेसाठी व पुढील माहिती घेणेसाठी पुढे दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधावा. बटूंची नोंदणी सोमवार दिनांक. २१ एप्रिल २०२५ पर्यंत पुढे दिलेल्या संबंधितांकडे करणे आवश्यक आहे.
संपर्कासाठी पत्तेः- हर्षल सुधाकर उर्फ राजू गवाणकर पटवर्धन चौक, कणकवली. मोबा नं.९४२२५८४९००, रामचंद्र रघुनाथ बांवकर स्वामी समर्थ इलेक्ट्रिक दुकान, पोस्टानजिक, आचरा रोड, कणकवली, मोबा नं.९४२१३२२७१४, राजेश महादेव आजगांवकर गजानन इलेक्ट्रिकल्स कणकवली, एस.टी. स्टॅन्ड नजीक, कणकवली. फोन नं.९४२१२६६४६४, अरुण वसंत सामंत. भगवती प्रिंटींग प्रेस, फोंडाघाट, मोबा. नं. ९४२३३००००१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





