सत्ता नसतानाही सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्याचा आत्मविश्वास निर्माण करा- वैभव नाईक

शिवसेना मालवण तालुका कार्यकारिणीच्या बैठकीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवसेना हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठं मोठ्या पदावर नेण्याचे काम शिवसेनेने केले आहे. बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार हिंदुत्वासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेना कार्यरत आहे. मात्र शिवसेना पक्षाचे ऋण विसरून काहींनी पक्षाशी गद्दारी केली ज्या पक्षाने त्यांना मोठे केले त्या पक्षावर, ठाकरे घराण्यावर ते टीका करत आहेत. आम्ही असतो तिथे सत्ता असते असा बागुलबुवा राणे, केसरकर, सामंत करत आहेत मात्र ते असतील तिथे सत्ता नाहीतर सत्ता असेल तिकडे राणे, केसरकर, सामंत आपल्या स्वार्थासाठी उड्या मारतात हा इतिहास आहे. आणि भाजप पक्ष देखील फोडाफोडीचे राजकारण करून केवळ प्रस्थापितांना पदे देत आहे. मला देखील संधी होती, संधी घेतली असती तर सत्तेत असलो असतो. मात्र आपल्याला तसे करायचे नाही शेवटपर्यंत निष्ठावंत म्हणूनच राहायचे आहे. आमदारांना आमिषे देऊन फोडाफोडी करून, लोकांना खोटी आश्वासने देऊन, समाजासमाजात तेढ निर्माण करूनच महायुती सरकारने मोठे बहुमत मिळविले आहे. आता हे जनतेच्या देखील हे लक्षात आले आहे. येणाऱ्या निवणुकांमध्ये जनता याचा हिशेब करणार आहे त्यामुळेच जिल्हा परिषद ,पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका घेतल्या जात नाही. सत्ता हि बदलत असते आज त्यांच्याकडे आहे तर उद्या आपल्याकडे असेल आपली सत्ता नाही म्हणून खचून न जाता संयम राखला पाहिजे. सत्ता नसतानाही सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्याचा आत्मविश्वास पदाधिकारी व शिवसैनिकांनी निर्माण केला पाहिजे. विरोधकांच्या आमिषांना धुडकावून लावले पाहिजे. जनता आपल्या सोबत आहे. जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवीत राहिल्यास निश्चितपणे पुन्हा आपण यशस्वी होऊ असा विश्वास माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका कार्यकारिणीची बैठक आज लीलांजली हॉल येथे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, माजी नगरसेवक नितीन वाळके,पराग नार्वेकर, गणेश कुडाळकर,मंगेश टेमकर, बाबा सावंत,महेश जावकर, प्रशांत सावंत, बाबा पास्कोल,विनोद सांडव,उमेश मांजरेकर,भाऊ चव्हाण,महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख पूनम चव्हाण, तालुकाप्रमुख दीपा शिंदे, युवतीसेना जिल्हाप्रमुख नीनाक्षी शिंदे, विभागप्रमुख बंडु चव्हाण,राजेश गावकर,समीर लब्दे, प्रवीण लुडबे, रुपेश वर्दम, नारायण कुबल,बाळ महाभोज,दाजी चव्हाण, पप्पू परुळेकर,नंदू गवंडी, प्रेमदत्त नाडकर्णी, रवी तळाशीलकर,राजू मेस्त्री,उमेश प्रभू,बाबू टेंबुलकर, शिवा भोजने,वंदेश ढोलम,बंड्या सरमळकर,गौरव वेर्लेकर,सचिन रेडकर, भारती आडकर,रूपा कुडाळकर,आर्या गावकर,विद्या फर्नांडिस,आरती नाईक,दिव्या धुरी, भाग्यश्री खान, जयू लुडबे,संतोष आंग्रे,अमोल वस्त, श्रद्धा वेंगुर्लेकर,नरेश हुले,मयूर करंगुटकर आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी भाई गोवेकर म्हणाले, मा. आम. वैभव नाईक यांच्यासारखे चांगले नेतृत्व आपल्याला लाभले आहे. त्यांचा पराभव झाला असला तरी सर्वसामान्यांसाठी ते झटत आहेत. सर्वसामान्यांच्या हृदयात अजूनही ते आमदार आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांचे नाव अभिमानाने घेतले जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्ष संघटना वाढविण्यासाठी आपण अधिक जोमाने मेहनत घेतली पाहिजे असे सांगितले.
याप्रसंगी हरी खोबरेकर,नितीन वाळके,मंदार ओरसकर,महेश जावकर,पूनम चव्हाण यांनी शिवसेना संघटना वाढीबाबत मार्गदर्शन केले.