खारेपाटण येथे दि.५ मार्च २०२५ रोजी “छावा” चित्रपटाचे प्रक्षेपण

खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दि.५ मार्च २०२५ रोजी खारेपाटण एस टी बस स्थानक येथे रात्रौ.९.३० वाजता सद्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन पटावर आधारित असलेला “छावा” चित्रपट मोफत दाखविण्यात येणार आहे.
तरी या ऐतिहासिक असलेल्या मोफत चित्रपटाचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा.असे आवाहन श्री सतीश गुरव मित्र मंडळ खारेपाटण च्या वतीने करण्यात आले आहे.