वाहनाच्या धडकेत जखमी बैलावर उपचार करत दाखवली सहृदयता

पशुवैद्यकीय डॉ. प्रवीण राणे तात्काळ झाले उपचारासाठी दाखल

सोमवारी पहाटे कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अज्ञात वाहनाने बैलाला धडक देऊन जखमी केले.दोन पादचाऱ्यांनी त्याला रस्त्याच्या बाजूला केले.ही बातमी त्या परिसरात राहणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण राणे यांना समजताच त्यांनी उपस्थित राहुन त्या बैलावर प्राथमिक उपचार केले. या अपघाताची माहिती तात्काळ श्री.वामन तर्फे यांनी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि माजी उपनगराध्यक्ष बंडु हर्णे यांना दिली.त्यांनी तात्काळ नगरपंचायत कर्मचारी पाठवले. यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते वामन तर्फे उपस्थित होते.

error: Content is protected !!