भगवती वाचनालय येथे मराठी राजभाषा दिन साजरा

महाराष्ट्राच्या साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कवी कुसुमाग्रज यांचे मोठे योगदान आहे.. मराठी भाषेचा शिक्षणामध्ये प्रसार व्हावा
मराठी ह्या बोलीभाषेला महत्वाचे स्थान मिळावे यासाठी कवी कुसुमाग्रज यानी प्रयत्न केले. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी हि राजभाषा असून तीचे संवर्धन आणि अधिकाधिक लेखन होण्याच्या उद्देशाने आणि मराठी भाषा निरंतर टिकवून रहावी म्हणून समाजातील प्रत्येक घटकाने ह्या भाषेच्या संवर्धनासाठी योगदान दिले पाहिजे असे मत भगवती वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद सावंत यानी व्यक्त केले. ते वाचनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी भाषा गौरव दिन या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद सावंत व उपाध्यक्ष महादेव ऊर्फ तात्या प्रभू यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी वाचनालयाचे कार्यकारीनी सदस्य संतोष लब्दे, मोतीराम वळंजू तसेच वाचनालयाचे कर्मचारी ग्रंथपाल विश्वास मुणगेकर, सोमनाथ रुपे,तसेच वाचकवर्ग मोहन परब ,पार्थ सावंत आदी उपस्थित होते
यावेळी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.