कलमठ ग्रामपंचायत नळयोजनेचे पाणी व्हेन्टिलेटरवर

स्वच्छ,निरोगी आणि मुबलक पाणी पुरवठा न झाल्यास आंदोलन
ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री, अनुप वारंग, हेलन कांबळी यांचा इशारा
कलमठ ग्रामपंचायत नळयोजनेचा अस्वच्छ पाण्याचा पुरवठा अद्याप थांबला नसल्या कारणाने काल २६ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत सदस्य श्री धीरज श्रीधर मेस्त्री आणि श्री अनुप वारंग यांनी नळयोजने जवळ जाऊन पाहणी करत ग्रामस्थांन सत्य समोर आणले. असे प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
गेले काही महिने ग्रामपंचायत कलमठ अस्वच्छ आणि दूषित पाण्याचा पाणी पुरवठा करत आहे.आशिये रोड जवळ असणार्या ग्रामपंचायत नळयोजनेच्या येथे
ड्रेनेजचे पाणी तेथील आजूबाजूच्या लोकवस्तीतून सोडले जात आहे.
याची कल्पना ग्रामपंचायत कलमठ यांना असून सुद्धा त्यावर ठोस पाउल अद्याप उचले गेले नाही आहे.
काल दिनांक २६ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कलमठ नळ योजनेचे पाणी ग्रामस्थांना वेळेत आले नाही याचे कारण अस्वच्छ (ड्रेनेजचे) पाण्याचा प्रवाह वाढून तेथील नदी पात्र अजून खराब झाल्याने पाणी सोडले गेले नाही असे कळाले.
त्यातून नगरपंचायत कणकवली नळयोजनेचा पाणी पुरवठा दिनांक २६ फेब्रुवारी पासून ग्रामपंचायत कलमठ नळयोजनेला चालू असल्याचे कळाले परंतु तो पाणी पुरवठा किती होईल पाणी मुबलक प्रमाणात देण्यात येईल का??
आणि किती महिने हा पाणी पुरवठा देण्यात येईल?
याची काहीच अद्याप कल्पना देण्यात आली नाही.
एकीकडे एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे गाव त्यातून मिळणार्या पाणीपट्टी आणि शासनाचा च्या योजनेचा लाभ योग्य तिथे होत नसल्याचे आढळून येत आहे.
आपल्या ग्रामपंचायत कलमठ नळयोजनेचे स्वच्छ पाणी आम्हाला मिळावे आणि ते होणे शक्य नसल्यास आशिया रोड येथून पाणी पुरवठा बंद करून दुसर्या कोंडी मधून पाणी पुरवठा करावा नाहीतर आंदोलन छेडण्याचा इशारा श्री धीरज श्रीधर मेस्त्री,श्री अनुप वारंग आणि सौ. हेलन कांबळी
यांनी ग्रामपंचायत कलमठला दिला आहे.