श्री देव गांगो – रवळनाथ मंडळ शिडवणे आयोजित राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेत मिलिंद केळकर कुसबे,कुडाळ प्रथम तर अभिनव राणे, कणकवली द्वितीय

जिल्हास्तरीय स्पर्धेत विठोबा चव्हाण,नांदगाव प्रथम, तर मंदार कर्पे,घाणवळे कुडाळ द्वितीय
गावठी बैलगाडा शर्यत प्रथम-संतोष रामचंद्र पाटणकर शिडवणे गावठाण,तर द्वितीय शुभम नर,शिडवणे
श्री देव गांगो – रवळनाथ मंडळ शिडवणे यांच्यावतीने नुकतीच दी.२५ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री देव गांगेश्र्वर मंदिराच्या खुल्या मैदानात भरविण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धेत कुडाळ कुसबे येथील श्री मिलिंद केळकर यांची बैलगाडी प्रथम आली असून कणकवली येथील श्री अभिनव राणे यांच्या बैलगाडीने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.तर याच वेळी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धेत नांदगाव कणकवली येथील श्री विठोबा चव्हाण यांचं8 बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला असून घानवळे कुडाळ येथील श्री मंदार कर्पे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.सर्व विजेत्या रोख रकमेची बक्षिसे व मानाची ढाल प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरविन्यात आले.
श्री देव गांगो – रवळनाथ मंडळाचे कार्यकर्ते व माजी जि.प वित्त व बांधकाम सभापती श्री रविंद्र उर्फ बाळा जठार तसेच श्री सरपंच श्री रवी शेट्ये यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली भरविण्यात आलेल्या या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यतीचे अनुक्रमे विजेते झालेले स्पर्धक पुढील प्रमाणे —
राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत –
प्रथम क्रमांक- (१५०००/- रुपये) श्री मिलिंद केळकर (कुसबे, कुडाळ) द्वितीय क्रमांक – (११०००/- रुपये)श्री अभिनव राणे (कणकवली),तृतीय क्रमांक – (७७७७/-) श्री सुरेश बरागडे (शाहूवाडी,मलकापूर),चतुर्थ क्रमांक – (५५५५/- रुपये) – श्री राजु बागवे (कुंदे,कुडाळ),पाचवा क्रमांक – (३३३३/- रुपये) श्री अमोल ठाकूर (हळवल,कणकवली)
जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यत – प्रथम क्रमांक – (१००००/- रुपये) – श्री विठोबा चव्हाण (नांदगाव,कणकवली),द्वितीय क्रमांक – (७०००/- रुपये) – श्री मंदार कर्पे (घावनळे,कुडाळ),तृतीय क्रमांक – (५०००/- रुपये) – श्री गुरुप्रसाद होडवडेकर (आडेली, वेंगुर्ला),चतुर्थ क्रमांक – (३०००/- रुपये)- श्री संतोष मर्ये (बावशी, कणकवली),पाचवा क्रमांक – (२०००/- रुपये) – श्री आप्पा देऊलकर (तर्से बांबर्डे)
गावठी बैलगाडा शर्यत – प्रथम क्रमांक – श्री संतोष रामचंद्र पाटणकर (शिडवणे गावठाण, कणकवली),द्वितीय क्रमांक – श्री शुभम नर (शिडवणे,कणकवली)
वरील सर्व विजेता स्पर्धकांना रोख रकमेची पारितोषिके व मानाची
ढाल देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवीन्यात आले.यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमाला माजी सभापती दिलीप तळेकर,श्री रवींद्र जठार,सरपंच रवी शेट्ये,श्रीमती रत्नप्रभा वळंजू, वारगाव उपसरपंच नाना शेट्ये,श्री सूर्यकांत भालेकर, विजय टक्के,संतोष टक्के इरफान मुल्ला ,पप्पू ब्रम्हदंडे,बबलू पवार श्री मुद्रस आदी मान्यवर उपस्थित होते.तर या स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री कोलते सर,श्री रणजित पाटील यांनी काम पाहिले तर संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री देव गांगो – रवळनाथ मंडळ शिडवणे च्या सर्व कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली.