शिवकालीन संस्कृतीचे संवर्धन : ‘श्रावणी कंप्युटर’ संस्थेचे युवा पिढीला आव्हान!

महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ले हे आपल्या गौरवशाली परंपरेचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहेत. या किल्ल्यांचे जतन आणि स्वच्छता राखणे ही काळाची गरज बनली आहे. या उद्देशाने छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) आणि MKCL चे अधिकृत केंद्र श्रावणी कंप्युटर एज्युकेशन, तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले संवर्धन व स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

या अभियानात CSMS DEEP DIPLOMA कोर्सचे विद्यार्थी सहभागी झाले होते. हा ॲडव्हान्स कंप्युटर कोर्स सारथी महामंडळाच्या माध्यमातून मराठा व कुणबी समाजातील वय वर्ष १८ ते ४५ यांच्यासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येतो. या विद्यार्थ्यांनी यावेळी खारेपाटण येथील किल्ल्याची स्वच्छता केली तसेच जनजागृतीपर भाषणे व विविध उपक्रम राबवले.

यावेळी श्रावणी कंप्युटर संस्थेचे संचालक सतीश मदभावे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. त्यांनी सारथी महामंडळ आणि MKCL यांचे आभार मानत, “अशा उपक्रमांमुळे युवा पिढीमध्ये सकारात्मक बदल होतील यात शंका नाही,” असे प्रतिपादन केले.

विद्यार्थ्यांच्या वतीने स्नेहल तळेकर आणि स्मितेश पाष्टे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी या उपक्रमामुळे मिळालेल्या प्रेरणेबद्दल आणि किल्ले संवर्धनाच्या गरजेबद्दल आपले विचार मांडले.

श्रावणी कंप्युटर एज्युकेशन ही सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेली संस्था असून, किल्ले संवर्धन, स्वच्छता मोहीम, किल्ले बांधणी स्पर्धा, व्यसनमुक्ती अभियान, युवा प्रबोधन, महिला सबलीकरण यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे समाजप्रबोधन करत आहे.

यावेळी श्रावणी कंप्युटर चे संचालक श्री.सतीश मदभावे यांच्यासोबत स्मितेश पाष्टे, सोहम सावंत, स्नेहल तळेकर ,अक्षय नरसाळे ,विक्रांत सावंत, प्रतीक हातगे, दीक्षा धावडे ,सुहानी मोरे ,रोहिणी भोगले, साईराज लाड, स्पर्शिका मदभावे हे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी किल्ले संवर्धनाचा संकल्प घेत आपल्या योगदानाची ग्वाही दिली.

error: Content is protected !!