निरंकारी सद्गुरुंनी रत्नागिरीमध्ये दिला प्रेम व शांतीचा संदेश
यथार्थ भक्तीने जीवनात मानवी गुण प्रविष्ट होतात – सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज
रत्नागिरी : “यथार्थ भक्ती केल्याने आपल्या जीवनात स्वाभाविकपणेच मानवी गुणांचा समावेश होतो ज्यायोगे आपले जीवन श्रेष्ठ बनते.” असे प्रतिपादन निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी गुरुवारी १६ मार्च रोजी सायंकाळी रत्नागिरीतील चंपक मैदानावर आयोजित केलेल्या एक दिवसीय निरंकारी संत समागमात उपस्थित विशाल जनसमूहाला को संबोधित करताना व्यक्त केले.
या समागमामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतून हजारोंच्या संख्येने भाविक-भक्तगण व प्रभुप्रेमी सज्जनांनी भाग घेतला. सद्गुरु माताजी व निरंकारी राजपिताजी यांच्या दिव्य दर्शनांनी श्रद्धालु भक्तांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता.
सद्गुरु माताजींनी आपल्या प्रवचनामध्ये सांगितले, की परमात्म्याला आपण कोणत्याही नावाने पुकारले तरी त्याचे शाश्वत अस्तित्व एकच आहे. मात्र त्या ईश्वराला प्रथम जाणून घेणे गरजेचे असून ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून त्याला जाणता येते. जाणल्यानंतर निदिध्यासन करुन जेव्हा आपण त्याला आपल्या हृदयामध्ये वसवतो तेव्हा आपण मानवी गुणांनी युक्त होऊन मानवतेने युक्त कर्मे करु लागतो. असे भक्तीमय जीवन जगण्यासाठी परमात्म्याची निरंतर जाणीव बाळगणे आणि त्याच्यावर दृढ विश्वास ठेवणे गरजेचे आहे. ईश्वराची निरंतर जाणीव आणि त्याच्यावरील दृढ विश्वास यांचा संगम झाल्यानंतर आपले भौतिक स्थिती कशीही असली तरी भक्त् सदैव प्रभू भक्तीमध्ये तल्लीन राहतो.
सदगुरु माताजी म्हणाल्या, की प्रत्येकामध्ये जेव्हा परमात्म्याचे रूप दिसू लागबते तेव्हा जाती-पाती किंवा वर्ण-वंश यांसारखे समस्त भेदभाव नाहीसे होतात. त्यायोगे आपले जीवन संत प्रवृत्तीचे बनते आणि परोपकाराची भावना मनामध्ये उत्पन्न होते. मानवतेची सेवा करताना त्याच्या मनात आपपर भाव येत नाही किंवा आपण कोणाला मदत करत आहोत असेही तो समजते नाही तर आपुलकीच्या व आत्मियतेच्या भावनेने तो सेवा करत राहतो.
शाश्वत निराकार ईश्वराच्या गुणांचे वर्णन करताना सद्गुरु माताजींनी सांगितले, की हा परमात्मा सर्वव्यापी आहे, ब्रह्मांडाच्या कणकणामध्ये सामावला आहे, तो बेअंत असून प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक ठिकाणी सदासर्वदा स्थिर व एकरस राहणारा राहतो. याच्याशी नाते जोडल्याने आपल्या मनालाही स्थिरता व शांती प्राप्त होते.
शेवटी सद्गुरु माताजींनी हेच समजावले, की भक्त आपल्या कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना या ईश्वराला प्राथमिकता देतो त्यामुळे त्याच्या या जबाबदाऱ्याही सहजपणे पार पडतात. याउलट जेव्हा आपण सांसारिक गोष्टींना प्राधान्य देतो तेव्हा त्यामध्येच अडकून पडतो आणि ईश्वरीय ज्ञानापासून वंचित राहतो आणि यथार्थ भक्ती न घडल्यामुळे आपले जीवन सार्थक होत नाही. आपण अंत:करणापासून भक्ती करायला हवी, भक्तीचा केवळ दिखावा उपयोगाचा नाही.
तत्पूर्वी समागमाच्या कार्यक्रमात अनेक वक्ता, गीतकार, गायक कलाकार व कवि सज्जनांनी विचार, गीत, भजन, कविता इत्यादि माध्यमातून जीवनामध्ये ब्रह्मज्ञानाचे महत्व पटवून देण्याचा प्रयास केला ज्याचा उपस्थित श्रोत्यांनी भरपूर आनंद घेतला.
रत्नागिरीमध्ये आयोजित या दिव्य संत समागमाच्या सोहळ्यामध्ये स्थानिक संयोजक श्री.रमाकांत खांबे यांनी समस्त भाविक-भक्तगण आणि शहरवासियांच्या वतीने सद्गुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी यांचे हार्दिक आभार व्यक्त केले तसेच स्थानिक प्रशासन व अन्य सरकारी विभागांना त्यांनी केलेल्या बहुमूल्य सहकार्याबद्दल धन्यवाद दिले.