शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुक्यातर्फे शिवजयंतीदिनी महारॅली

दुचाकी – चारचाकी रॅलीचे आयोजन

विविध सामाजिक उपक्रमही होणार

शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : युवा नेते प्रताप भोसले यांचे आवाहन

शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुका यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे दुचाकी, चारचाकी महारॅलीचे आयोजन बुधवार, १९ फेब्रुवारीला करण्यात आले आहे. रॅलीचे हे सलग आठवे वर्ष आहे.

रॅलीचा प्रारंभ वरवडे येथे सकाळी १० वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तेथून रॅली कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात दाखल होईल. पुढे रॅली मुख्य बाजारपेठमार्गे शिवाजीनगर येथे दाखल होईल. तेथील शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन, अभिवादन करून रॅली कणकवली – कनेडी मार्गावरून सर्व्हिस रोडवर पोहोचेल. पुढे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाल्यानंतर तेथील शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करून रॅलीचा समारोप होईल.

शिवजयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुका यांच्यातर्फे कणकवली तालुक्यात ठिकठिकाणी होणाऱ्या शिवजयंती कार्यक्रम, उत्सवांना भेटी देण्यात येणार आहेत. दिवसभरात अनेक सामाजिक उपक्रमही होणार आहेत. महारॅली व सामाजिक उपक्रमांना शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा समाजाचे युवा नेते तथा शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले (९१३७८३९५३२) यांनी केले आहे.

error: Content is protected !!