जलजीवन मिशनच्या आढाव्यासाठी उद्या कणकवलीत प्रहार भवन येथे बैठक
आमदार नितेश राणे घेणार या योजनेच्या कामांचा आढावा
हर घर जल या संकल्पनेवर आधारित सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, जिल्ह्यात अनेक नळ योजने ची कामे देखील सुरू करण्यात आली आहेत. या कामांना अजून गती मिळावी व जलजीवन मिशन अंतर्गत या योजनेचा उद्देश साध्य व्हावा व प्रत्येक नागरिकाला स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे याकरिता ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी उद्या 19 मार्च रोजी दुपारी 1. वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा जीवन मिशनचे अधिकारी यांची कणकवलीत कणकवलीत प्रहार भवन येथे आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या योजनेच्या कामांचा आढावा घेत असताना गतिमान कामे होत पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कामे पुरी करावी त्याकरिता या बैठकी सूचना दिल्या जाणार आहेत.
दिगंबर वालावलकर / कणकवली