पाट येथे रविवारी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
कुडाळ : सिंधु संजीवनी ग्रुप आणि बी. के. एल. वालावलकर रुग्णालय श्री क्षेत्र-डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १९ मार्चला सकाळी १० ते दुपारी ३ या काळात पाट येथील केंद्रशाळेत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रूग्णालयाचे तज्ञ नेत्ररोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, जनरल फिजिशन, अस्थिरोग तज्ञ, कान-नाक-घसा तज्ञ, जनरल सर्जन आणि कॅन्सर रोग तज्ञ उपस्थित राहणार आहे. यावेळी तपासणीनंतर संबंधित रुग्णाला मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करून दिली जाणार आहे. यामध्ये ५० टक्के दरात चष्मा उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी या तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ