सांगा आम्ही काय करायचे?

कणकवली फ्लाय ओव्हर ब्रिज खालील विक्रेत्यांचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंना साकडे
अतिक्रमण हटाव मोहिमेच्या निर्णयावर राणेंच्या भूमिकेकडे लक्ष
कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिज खालील अतिक्रमण हटाव मोहिमेकरिता आज पोलीस बंदोबस्तात महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाल्यानंतर कणकवली नरडवे नाक्यावरून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. जे विक्रेते स्वतःहून स्टॉल हटवण्याची ग्वाही देत आहेत ते वगळून अन्य स्टॉल व विक्रेत्यांची दुकाने हटविण्यात ची कार्यवाही हाती घेण्यात आली. मात्र या दरम्यान या ब्रिज खाली बसणाऱ्या सर्व भाजी, फळ, फुले व अन्य स्टॉल धारकांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कणकवली मधील निवासस्थानी धाव घेतली आहे. दोन वर्षाच्या कोविड काळा नंतर आता व्यापार उद्योग सुरू केला. मात्र सांगा आता आम्ही काय करायचे? असा सवाल करत या विक्रेत्यांनी नारायण राणे यांच्या कडून कारवाईला शिथिलता देण्याची आदेश देण्याची अपेक्षा ठेवली आहे. तर आता या अनधिकृत स्टॉल हटाव कारवाई संदर्भात राणे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली