भाजपा नेते “निलेश राणे” यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा

 भाजपा कुडाळ शहर पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये उत्साह

कुडाळ : भाजपा कुडाळ शहर पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्या वतीने कोकणचे सुपुत्र तथा भाजप नेते निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळेश्वर मंदिर येथे सकाळी अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर कुडाळ महिला व बाल रुग्णालय तसेच कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे तसेच बिस्किट्स वाटप कार्यक्रम करण्यात आली. तसेच गांधीचौक येथे रिक्षाचालकांना तसेच कुडाळ एसटी बसस्थानकामधील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना लाडू वाटप करण्यात आलं. त्यानंतर कुडाळ नगरपंचायत कार्यालय येथे आरोग्य कर्मचारी यांना भेटवस्तू वाटप करण्यात आलं. विविध सामाजिक उपक्रमांनी कुडाळ शहर भाजपा पदाधिकारी व नगरसेवकांनी उत्साहात भाजप नेते निलेश राणे यांचा वाढदिवस साजरा केला. 
यावेळी महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, जिल्हा चिटणीस बंडया सावंत, शहराध्यक्ष राकेश कांदे, गटनेते विलास कुडाळकर, महिला शहर अध्यक्ष ममता धुरी, नगरसेविका प्राजक्ता शिरवलकर नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेवक निलेश परब, नगरसेवक  गणेश भोगटे, नगरसेविका नयना मांजरेकर, नगरसेविका चांदणी कांबळी, महिला जिल्हा चिटणीस रेखा काणेकर, राजेश पडते, बाळू कुडाळकर, माजी नगरसेविका साक्षी सावंत, चिटणीस रेवती राणे, तेजस्विनी वैद्य, अनुप जाधव, सखू आकेरकर, विशाखा कुलकर्णी यांच्यासह भाजपा पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!