18 मार्च रोजी मालवण येथे उद्योजक संवाद मेळावा

मालवण : माजी खासदार. निलेश राणे यांच्या. पुढाकारातून नारायण राणे* लघु सुक्ष्म मध्यम उद्योग कैबिनेट मंत्री यांचा मार्गदर्शना खाली. लघु सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार MSME यांच्या सहकार्याने शनिवार दिनांक 18 मार्च 2023 रोजी दुपारी 2.30 वाजता मालवण दैवज्ञ भवन येथे उद्योजक, नवीन उद्योजक, व्यापारी, होलसेलर, बचत गट यांना उद्योगासाठी आवश्यक कर्ज पुरवठा , सरकार कडून मिळणारे अनुदान याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
ज्या उद्योजकांची कर्ज प्रकरणे बॅकेने प्रलंबित ठेवली आहेत .तसेच सरकारचे अनुदान उपलब्ध झालेले नाही .अशा उद्योजका नाही यावेळी मार्गदर्शन करून प्रश्न सोडवण्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केला जाणार आहे .या मार्गदर्शन मेळाव्यात
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती PMEP ,मुख्यमंत्री रोजगार निर्मिती CMEGP खादी ग्रामोद्योग कर्जपुरवठा व अनुदान, कॉयर बोर्ड नारळापासून वस्तू बनवणे यासाठी कर्ज पुरवठा आणि अनुदान व आवश्यक बाजार पेठ, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मश्चिमाराना फायदे, अनुसूचित जाती जमाती उद्योजकांना व्यवसायाबद्दल माहिती व प्रशिक्षण व अनुदान, एक कोटी वरील उद्योगाला MSME मार्फत स्वतंत्र मार्गदर्शन व प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी मार्गदर्शन, पर्यटन उद्योगासाठी मार्गदर्शन, सामूहिक उद्योग क्लस्टर याची सविस्तर माहिती व फायदे, महिला उदयोजकांना ८०% अनुदान मिळणारी योजना.
अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उद्योगाची उद्योग लाभार्थींसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा मार्गदर्शन या मेळाव्यास MSME चे वरिष्ठ अधिकारी त्याचबरोबर खादी ग्रामोद्योग, जिल्हा उद्योग केंद्र , कॉयर बोर्ड ,एस सी /एस टी हब या सर्वांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
उद्योजकांना कर्ज पुरवठा घेताना आवश्यक असणारे उद्योग आधार चे नोंदणी सर्व उद्योजकांना मोफत करून देण्यात येणार आहे. सर्व उद्योजकांनी, व्यापारी बांधवांनी ,बचत गट यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन मौनीनाथ मंदिर ट्रस्ट, मालवण यांच्यावतीने करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी
श्री.विजय केनवडेकर
जिल्हाध्यक्ष
उद्योग व्यापार आघाडी भाजपा सिंधुदुर्ग .
फोन: 9420206873
श्री.गणेश कुशे
अध्यक्ष
मौनीनाथ मंदिर ट्रस्ट यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!