बापाच्या डोक्यावर मुलाने मारला दांडा

कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंगुळी मोरजकरवाडी येथील घटना

कुडाळ : स्पीकरचा आवाज कमी करा असे वडिलांनी सांगितले म्हणून मुलाने वडिलांच्या डोक्यावर दांडा मारून त्यांना जखमी केले. ही घटना पिंगुळी मोरकरवाडी येथे घडली. यामध्ये ४५ वर्षीय संजय तुकाराम मोरजकर याच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंगुळी मोरजकरवाडी येथील तुकाराम नाना मोरजकर हे जेवण करून आपल्या घरासमोरील अंगणात बसले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा संजय तुकाराम मोरजकर आणि त्याचा मित्र हे दोघेजण ‘करा ओके’ वर गाणी गात होते. या गाण्यांचा आवाज मोठा असल्याने त्यांचे वडील तुकाराम मोरजकर यांनी सांगितले की, स्पीकरचा आवाज कमी करा. त्याचा राग संजय मोरजकर यांना येऊन त्यांनी आपल्या वडिलांना धक्काबुक्की करून त्यांच्या डोक्यावर दांडा मारून जखमी केले. याप्रकरणी त्यांचा मुलगा संजय मोरजकर यांच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!