गावपळणीचा एक दिवस वाढल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साह

संकष्टी चतुर्थी एकत्र साजरी करण्याचा ग्रामस्थांचा मनोदय

आचरा गावपळणीचा गाव भरण्याबाबत देवाचा हुकूम मिळाला नसल्याने एक दिवस वाढल्याने आचरा ग्रामस्थांमध्ये उत्साह संचारला आहे.आज संकष्टी असल्याने ग्रामस्थांनी ती एकत्रच साजरी करण्याचे ठरवले आहे.त्यामुळे सामुदायिक रीत्या मोदक बनविणे, गणपतीची आरती फुगड्या घालणार असल्याचे ग्रामस्थांमधून सांगितले जात आहे.
याबाबत बोलताना पारवाडी येथील जेष्ठ नागरिक वामन परब सांगतात मला ७८वर्ष झाली या गावपळणीत सगळे गुण्यागोविंदाने एक विचाराने आनंदाने राहतात ते बघून खूप बर वाटतेय. सौनम्रता परब सांगतात देवाने गावपळणीचा एक दिवस वाढविल्याने आम्हाला आनंदाचा एक दिवस मिळाला त्यामुळे आज सर्व महिला मिळून मोदक बनविणार फुगड्या घालणार असल्याचे सांगितले.समिर ठाकूर यांनी सांगितले कि गावपळणीमुळे आम्हाला पर्वणीच मिळते एक दिवस वाढल्याने आज सगळे आनंदात आहोत. राजेश परब परशुराम शेट्ये सांगतात गावपळणीचा एक दिवस वाढल्याने आनंद होत असल्याचे सांगितले.तर डोंगरेवाडी महिलांनी सायंकाळपासूनच मोदक बनविण्यासाठी कंबर कसल्याचे दिसून येत होते.एकूणच बुधवारी
गावपळणीचा एक दिवस वाढल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साह संचारल्याचे जाणवत होते.

error: Content is protected !!