कणकवली शहरातील बंधाऱ्यांना प्लेट लावून पाणी अडवा

भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांची कार्यकारी अभियंताकडे मागणी
कणकवली शहरातील कनकनगर व मराठा मंडळाकडील बंधाऱ्यावर ताबडतोब प्लेटी घालून पाणी अडवावे. अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जेणेकरून पाण्याची पातळी वाढून कणकवली शहर व आजूबाजूच्या गावातील लोकांना पाण्याची कमतरता भासणार नाही. त्यामुळे आपण तातडीने या दोन्ही बंधायांवर प्लेटी घालून पाणी अडवावे अशी मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे.





