राज्याचे माजी तंत्र शिक्षण मंत्री दत्ताजी राणे यांचे निधनजानवली गावचे सुपुत्र

महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दत्ताजी राणे यांचे बुधवारी पहाटे मुंबईत दुःखद निधन झाले

 1995 मधील शिवसेना-भाजपा युतीच्या काळात दत्ताजी राणे हे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते 

दत्ताजी राणे हे कणकवली तालुक्यातील जाणवली गावचे सुपुत्र होत दत्ताजींच्या निधनाबद्दल गुरुवार दिनांक 19 जानेवारी रोजी विशेष शोकसभा सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालय जाणवली येथे आयोजित करण्यात आल्याचे जाणवली चे सरपंच अजित पवार यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले या शोकसभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही जाणवली सरपंच अजित पवार यांनी केले आहे 

 भारतीय जनता पार्टी मुंबईचे सरचिटणीस सुनील राणे यांचे दत्ताजी राणे हे वडील होत दत्ताजींच्या जाण्यानं जाणवली या त्यांच्या जन्म गावीही शोक व्यक्त होत आहे

error: Content is protected !!