ना.नितेश राणे यांच्या मंत्रिपदामुळे सिधुदुर्गच्या विकासाला गती मिळणार!

भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांचा विश्वास

नागपूर अधवेशनात भेट घेऊन दिल्या शुभेच्छा

महायुती सरकारमधील डॅशिंग नेतृत्व व मंत्री नितेश राणेंच्या अभ्यासू आणि मेहनती गुणांचा सिंधुदुर्गचा विकासासाठी निच्छित लाभ होईल. त्यांच्यात मेहनत घेण्याची प्रचंड ऊर्जा आहे. त्याचा फायदा कोकणी जनतेला निश्चित होईल.
स्थानिक तरुणाईच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी एमआयडीसी, सी वर्ल्ड सारखे प्रकल्प मार्गी लावून नारायण राणे यांच्या कारकिर्दीची आठवण करून देतील असा त्यांचा तरुण सहकारी म्हणून मला विश्वास आहे अशी माहिती भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी दिली. नागपूर येथे अधिवेशन दरम्यान मंत्री नितेश राणे यांच्या दालनात त्यांची त्यांनी भेट घेतली.

error: Content is protected !!