“मंत्री महोदय” कानडे बुवांचे बॅनर ठरत आहेत लक्षवेधी

कणकवली शहरात कॅबिनेट मंत्री नितेश राणेंच्या अभिनंदनचे लावले आहेत बॅनर
मुंबई पुण्याच्या धर्तीवर आगळ्यावेगळ्या स्टाईलचे बॅनर
राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर काहीच वेळात कणकवलीसह जिल्हाभरात अनेक ठिकाणी मंत्री नितेश राणेंच्या अभिनंदनाचे बॅनर लागले. मात्र या सर्व बॅनर मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज मानधन समितीचे जिल्हाध्यक्ष व सुप्रसिद्ध भजनी बुवा संतोष कानडे यांनी कणकवली शहरात लावलेले “मंत्री महोदय” हे बॅनर सध्या लक्षवेधी ठरत आहेत. मुंबई पुणे या शहरांच्या धर्तीवर एका आगळ्यावेगळ्या स्टाईलने मंत्री नितेश राणे यांचा फोटो असलेले तब्बल 25 फुटी बॅनर हे सध्या लक्षवेधी ठरत आहेत. त्यामध्ये कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा मोठा फोटो त्याखाली भाजपचे पक्षाचे चिन्ह, त्या बाजूला विधान भवनाचा फोटो, बाजूला हार्दिक अभिनंदन व त्याखाली मोठ्या अक्षरांमध्ये “मंत्रिमहोदय नितेश राणे साहेब” असा उल्लेख असलेले हे बॅनर कणकवलीमध्ये सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.





