कणकवलीतील भाजपा पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांना दिल्या शुभेच्छा

मंत्रीपदी नाव निश्चित झाल्यानंतर घेतली नागपूर येथे भेट
कणकवली मतदारसंघाचे आमदार व हिंदूंचे नेते म्हणून राज्यभर ओळख असलेले नितेश राणे यांचे मंत्रीपदी नाव निश्चित झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी आमदार नितेश राणे यांची नागपूर येथे भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत माजी जी प अध्यक्ष गोट्या सावंत, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संदीप सावंत, सर्वेश दळवी, स्वप्निल चिंदरकर, समीर प्रभूगावकर प्रज्वल वर्डम आदी उपस्थित होते.





