मंत्रिपदी नाव निश्चित झाल्यानंतर अबिद नाईक यांच्याकडून नितेश राणेंना शुभेच्छा

नागपूर येथे भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोबत राहणार असल्याची दिली ग्वाही
कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांना भाजपा कडून मंत्री पदासाठी प्रदेशाध्यक्षांचा फोन आल्यानंतर नागपूर येथे त्यांची सदिच्छा भेट घेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी शुभेच्छा दिल्या. आमदार नितेश राणे आणि अबिद नाईक यांची गळाभेट देखील झाली. आमदार नितेश राणे यांना शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायम तुमच्या सोबत राहील अशी ग्वाही देखील नाईक यांनी दिली.





