भाजपचे नेते माजी सार्वजनिक मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे.

फडणवीस सरकार मध्ये रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रवींद्र चव्हाण यांच्यावर पक्षातर्फे मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यांच्याकडे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपद सोपविली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले श्री चव्हाण यांनी. लोकसभा निवडणुकीत कोकण विभागात घवघवीत यश मिळवून दिले आहे. विधानसभा निवडणुकीतही भाजपला मोठे यश मिळवून दिले आहे. आतापर्यंत कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, प्रथमच श्री चव्हाण यांनी कोकण विभाग भाजपमय केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात येणार आहे. रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने कोकणला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे यापूर्वी विनोद तावडे हे सुद्धा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत त्यामुळे विनोद तावडे यांच्यानंतर कोकणकडे ही मोठी जबाबदारी येणार आहे.





