जिल्हा परिषदच्या या क्रीडा स्पर्धांना महोत्सवाचे स्वरुप
माजी उपसभापती आशिये सरपंच महेश गुरव यांचे प्रतिपादन
कणकवली केंद्रस्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा शुभारंभ
कुठलीही स्पर्धा म्हटल्यावर हार जीत होत असते मात्र , जिल्हा परिषदच्या माध्यातून सुरु करण्यात आलेल्या या स्पर्धांमुळे अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात यश मिळवताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्राकडे वळत असताना अभ्यासाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. या स्पर्धामध्ये कुठलाही संघ अथवा वैयक्तिक खेळाडूंची हार जीत होणार आहे. त्या जिंकणा-या खेळाडूंबरोबर हरलेल्या खेळाडूंनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. जिल्हा परिषदच्या या क्रीडा स्पर्धांना महोत्सवाचे स्वरुप आल्याचे प्रतिपादन माजी उपसभापती , आशिये सरपंच महेश गुरव यांनी केले.
कणकवली कॉलेजच्या पटांगणावर कणकवली केंद्रस्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचा शुभारंभ आशिये सरपंच महेश गुरव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व क्रीडा ज्योत प्रज्वलीत करण्यात आली. यावेळी कणकवली कॉलेजचे प्राचार्य युवराज महालिंगे , विद्यामंदीर मुख्याध्यापक पी.जे.कांबळे, पत्रकार भगवान लोके , शिक्षक अच्युतराव वणवे , प्रा. हरिभाऊ भिसे , केंद्रप्रमुख. के.एम. पवार, क्रेंद्र मुख्याध्यापिका सायली गुरव, क्रिडाप्रमुख सतीश कदम ,उपक्रिडाप्रमुख रमेश डोईफोडे, क्रीडापंच प्रमोद पवार , लक्ष्मण पावस्कर , अमित हर्णे , श्रीकांत बुचडे , मधुरा सावंत , वर्षा प्रभु, नेहा मोरे , शिल्पा सावंत , इंदु डगरे , विद्या लोकरे आदींसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी क्रीडा स्पर्धेबाबत प्रतिज्ञा चैतन्य कदन यांनी घेतली.
विद्यामंदीरचे मुख्याध्यापक पी.जे.कांबळे म्हणाले , प्राथमिक विभागात या क्रीडा स्पर्धांचे चांगल्या प्रकारे आयोजन केले जाते. क्रीडा स्पर्धांमधून ज्ञानदानाचा विकास होतो. क्रीडेतून राष्ट्राचा विकास होतो.
17 डिसेंबरला समारोप
ज्ञानी मी होणार (लहान व मोठा गट) समूहगान व समूहनृत्य (लहान व मोठा गट) समारोप
सकाळी 9 वाजता पासून कलमठ, कुंभारवाडी येथे होणार आहे.