कणकवलीत रात्री एकाला बेदम मारहाण

तक्रारीसाठी पोलिसात दाखल मात्र तक्रार दाखलच नाही

कणकवलीत घडलेल्या या प्रकाराची सर्वत्र चर्चा

कणकवली शहरात काल बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एका चर्चेत असलेल्यावर “प्रकाश” ला बेदम मारहाण करण्यात आली. एकाच पक्षाचे दोन कट्टर कार्यकर्ते असलेल्यांनी ही मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या मारहाणी मध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत देखील झाली आहे. मात्र डोक्याला गंभीर दुखापत होऊन देखील याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. कणकवलीत भर चौकात हा प्रकार घडल्याचे समजते. दरम्यान या मारहाणीचे कारण नेमके समजू शकले नसले तरी एकाच पक्षाचे दोन सातत्याने चर्चेत असणारे कार्यकर्ते व यापूर्वी सावकारी करणाऱ्या यांच्यामध्ये हा वाद झाला. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. व यात त्याच्या डोक्यावरच लख्ख “प्रकाश” पडला. यात डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली आहे. मात्र त्यानंतर टाकलेल्या अवस्थेत तो मार खाल्लेला पोलिसात गेला. तेथून त्याला मेडिकल साठी पत्र देण्यात आले. मात्र त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली नसल्याची बाब समोर आली आहे. मात्र भर चौकात झालेल्या या हाणामारीमुळे कणकवलीतील अशा प्रकारांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

Leave a Reply

error: Content is protected !!