तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आयडियलची स्कूल ची चमक.
कणकवली/मयूर ठाकूर
न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट इथे नुकत्याच संपन्न झालेल्या 52 व्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे च्या (9 वी ते 12 वी गटात) सुश्रुत मंदार नानल ( 9 वी अ ) या विद्यार्थ्याने तयार केलेल्या हवा प्रदूषणापासून शाईची निर्मिती या वैज्ञानिक प्रतिकृतीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.तर याच विज्ञान प्रदर्शनात घेण्यात आलेल्या प्रश्न मंजुषा स्पर्धेत 6 वी ते 8 वी या लहान गटात गौरेश तायशेटे (7 वी अ ) आणि आयुष बागवे( 8 वी अ) या जोडीने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
या विज्ञान प्रदर्शनात सहभागी सर्वच विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली.
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष उपाध्यक्ष श्री मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा.हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई,प्रशालेचे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.