अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेचा रविवारी कणकवलीत भव्य मेळावा.
![](https://kokannow.in/wp-content/uploads/2024/12/IMG-20241206-WA0007.jpg)
जिल्ह्यातील सर्व भजनीबुवा-पखवाजवादक-तबला वादक- झांज वादक -कोरस मंडळी-भजनप्रेमी यांनी उपस्थित राहण्याचे कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थेचे आवाहन
कणकवलीतील मातोश्री मंगल कार्यालय येथे भरणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी बुवांचा भव्यमेळा.
कणकवली/मयूर ठाकूर.
राज्यातील सर्व भजनीबुवांचा संच असलेल्या अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेचा मेळावा कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. हा मेळावा 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी मुंबई येथे होऊ घातलेल्या भव्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संपन्न होत आहे.मुंबईमध्ये होणाऱ्या या भव्य अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री,सांस्कृतिक मंत्री, कोकणातील सर्व आमदार,खासदार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व भजनी बुवा,पखवाज वादक,तबला वादक, झांज वादक,कोरस मंडळी,भजन प्रेमी या सर्वांसाठी हा भव्य मेळा असणार आहे.या अधिवेशनामध्ये भजनी कलेला राजाश्रय मिळवून देण्यासाठी विविध विषयांवर चर्चा होणार असून .कलाकार मानधनामध्ये वाढ व्हावी तसेच जिल्ह्यातील वृद्ध कलाकार मानधनासाठी पात्र उमेदवार यांची संख्या वाढावी.तसेच भजनी कलाकारांसाठी विविध शासकीय योजनांची निर्मिती व्हावी अश्या विविध मागण्यासंदर्भात हे अधिवेशन संपन्न होणार आहे.
या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कणकवली येथे या संस्थेच्या माध्यमातून भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्याचे आयोजन कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थेने केले आहे. या मेळाव्यास भगवान लोकरे,रामदास कासले,श्रीधर मुणगेकर,प्रमोद हर्यांन,लक्ष्मण गुरव,गोपीनाथ बागवे,प्रमोद धुरी,भालचंद्र केळुसकर, गणेश पांचाळ, नारायण वाळवे,विजय परब,संजय पवार,सुशील गोठणकर तसेच इतर सर्व कोकणातील मान्यवर भजनी बुवा मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व जेष्ठ श्रेष्ठ सरबत भजनी बुवा,नवनिर्वाचित भजनी बुवा, स्पर्धेमध्ये गायन करणारे सर्व भजनी बुवा,पखवाज वादक,तबला वादक, झांज वादक,कोरस मंडळी तसेच भजन प्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थेने केले आहे.