कणकवली शहरात सोनगेवाडी येथे संदेश पारकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ

सामान्य जनतेचा हक्काचा माणूस म्हणून संदेश पारकर विजयी होतील – सुशांत नाईक
महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ कणकवली विधानसभेत गावोगावी सुरु आहे. कणकवली शहरातील सोनगेवाडी वॉर्ड क्र. ११ येथे संदेश पारकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. सामान्य जनतेचा हक्काचा आमदार म्हणून संदेश पारकर विजयी होतील असा विश्वास युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी व्यक्त केला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, काँग्रेस तालुकाअध्यक्ष प्रदीप मांजरेकर, जय शेट्ये, संतोष पुजारे, सी. आर. चव्हाण व आदी शिवसैनिक उपस्थित होते.




