साकेडी मध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून संदेश पारकर यांच्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभ

घरोघरी जनतेच्या भेटी घेत मोठ्या मताधिक्याने संदेश पारकर यांना विजयी करण्याचे केले आवाहन

कणकवली विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज साकेडी मधील पावणादेवी मंदिर येथून करण्यात आला. साकेडी गावामध्ये घरोघरी फिरत संदेश पारकर यांना मतदान करून बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच घराणेशाहीला थारा नको. तुमच्या शब्दाला केव्हाही ओ देणारा आपल्याला हक्काचा आमदार हवा असे आवाहन मतदारांना करण्यात आले. या वेळी शाखाप्रमुख संदीप राणे, युवा सेना विभाग प्रमुख किरण वर्दम, माजी शाखाप्रमुख मुरारी राणे,सुनील घाडी,बाबू राणे,सागर गुरव,राजू राणे,नारायण वर्दम, तुकाराम ढवण,नाना घाडी,आदेश सावंत,सुरज वर्दम आदी शिवसैनिक उपस्थित होते. या प्रचारफेरी दरम्यान विभाग प्रमुख सुदाम तेली व शिवसेना पदाधिकारी रामदास विखाळे यांनी प्रचारात सहभागी होत जनतेशी संवाद साधला.

error: Content is protected !!