भडगाव खुर्द रवळनाथ मंदिराचे अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी भरीव मदत करण्याच निलेश राणे आश्वासन

भडगाव खुर्द येथे जलजीवन मिशन योजना, डोंगरी विकास कार्यक्रमांच दिमाखात भूमिपूजन

कुडाळ : भडगाव खुर्द येथे केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अभियान व डोंगरी विकास कार्यक्रमाअंतर्गत मंजूर कामांची भूमिपूजन भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भडगाव खुर्द गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिरात जाऊन निलेश राणे यांनी दर्शन घेऊन त्यानंतर जलजीवन मिशन अभियान व डोंगरी विकास कार्यक्रमातुन मंजूर झालेल्या कामांचे एकत्रित भूमिपूजन करण्याचा मान भडगाव खुर्द गावचे मानकरी सुनील गुरव यांना देत त्यांना नारळ वाढवून जलजीवन मिशन व डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत असलेल्या कामांचा शुभारंभ केला. यावेळी रवळनाथ मंदिराच्या रखडलेल्या कामाची स्थिती जाणून घेत आपण पुढील काम पूर्णत्वास नेण्यासाठी जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन देत स्वीय सहाय्यक योगेश घाडी यांना मंदिराच्या कामसंदर्भात पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या. यावेळी तालुकाध्यक्ष दादा साईल, जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर, युवा मोर्चा अध्यक्ष पप्या तवटे, शक्तीकेंद्र प्रमुख विजय माळकर, सचिन माळकर, संजय अंबारे, हिराजी गुरव, सुहास गुरव, शैलेश गुरव, अमित गुरव, नारायण कदम, रवी गुरव, धोंडी कदम, अनिल सावंत, उत्तम कदम, विवेक कदम, विघ्नेश घाडी, प्रितेश गुरव, अनिरुद्ध लोट, संतोष राणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!