पियाळी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कुडतरकर यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

तालुकाध्यक्ष अनंत पीळणकर यांनी केले पक्षात स्वागत
कणकवली तालुक्यातील पियाळी गावठाण सामाजिक कार्यकर्ते प्रवीण प्रभाकर कुडतरकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या कार्यावर विश्वास ठेवून या जिल्ह्याचे अध्यक्ष अमित सामंत व कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर यांच्यावर विश्वास ठेवून आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला.
आत्ताच्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये आमच्याकडे कोणतेही सत्ता नसताना उमेदवार नसताना आज आमच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश हा एक राष्ट्रवादी पक्षासाठी आजचा दिवस खूप चांगला मानला जाईल. खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीचे उमेदवार महायुतीचे उमेदवार असताना सुद्धा सर्वसामान्य माणसांचा कल हा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. हे दिसून येते. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याकडे जो त्यांनी विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. मी प्रवीण कुडतरकर यांचे मनापासून पक्षात स्वागत करतो. तसेच त्यांची कणकवली उप तालुका प्रमुख पदावर जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या आदेशाने मी आज नियुक्ती करत आहे आणि त्यांना पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा आहेत. अशी माहिती तालुकाध्यक्ष अनंत पीळणकर यांनी दिली.यावेळी फोंडा विभाग प्रमुख महेश चव्हाण नवीन कुर्ली विभाग प्रमुख उत्तम तेली लोरे विभाग प्रमुख रमेश राणे तुषार पिळकर आदी उपस्थित होते.





