संदेश पारकर हेच कणकवली मतदारसंघाचे विकासाभिमुख नेतृत्व

वैभववाडी मध्ये गावभेटीदरम्यान जनतेच्या प्रतिक्रिया
वैभववाडी तालुक्यातील संदेश पारकर यांना विक्रमी मतदान करून देणार
वैभववाडी तालुक्यातील खांबाळे येथील आदिष्टी देवी मंदिरात संदेश पारकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी येथील दहशतवाद मोडून काढण्यासाठी संदेश पारकर यांच्या पाठीशी ठामपणे राहणार व संदेश पारकर यांना या तालुक्यातून शंभर टक्के मतदान करणार असा निर्धार केला. तसेच आमच्या भागाचा विकास संदेश पारकर हेच करू शकतात असे उद्गार येथील ग्रामस्थांनी जनतेला संबोधित करताना केले.. त्यामुळे संदेश पारकर यांचा 100% विजय पक्का आहे असा निर्धार खांबाळे गावातून करण्यात आला.. यावेळी संदेश पारकर यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पीळनकर, शिवसेना तालुकाध्यक्ष मंगेश लोके संजय हिर्लेकर, दीपक चव्हाण, अरुण माळकर, विठोबा सुतार, अशोक पवार, सुनील पवार, बाळा गुरव, मंगेश सूद, प्रवीण गायकवाड, रामदास पवार, तुषार चव्हाण, बंड्या गुरव, संजय साळुंखे, संतोष पवार, पुंडलिक परब, मारुती पवार, मकरंद गुरव, स्वप्निल पवार, रामदास पवार, रामदास माळकर, अभिजीत रावराणे, सत्यजित रावराणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.





